शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

कासार सिरसी (बालाजी मेलगिरे) : सध्या राज्यात कोरडे वारे वाहत असल्याने शेतकऱ्याचे डोळे आकाशाकडे लागुन असलेलले दिसून येत आहे.मृग नक्षत्र निघून दोन दिवस उलटून गेले तरीही अजून कडक ऊन, कोरडे आकाश व कोरडे वारे वाहत असल्याने शेतकऱ्याचे डोळे आकाशाकडे लागुण राहिले आहेत.
पेरणी पूर्व शेती मशागत कामे करून शेतकरी राजा काळे आईची ओटी भरण्यात सज्ज झालेला दिसून येत आहे.
खात बी -बियाण्याचे भावा आकाशाला भिन्नलेले आहे असल्या महागाईच्या दिवसात काटकसरीने संसार करून थोडेबहुत पैसे उरवून खत व बी बियाणे खरेदी करण्यास शेतकरी राजा मार्केटमध्ये हेलपाटे मारताना दिसत आहेत
येणारा साल चांगला जावा पीक पाणी जोरात यावा, मालाला योग्य भाव मिळावा, संसार सुखाचा व्हावा असे स्वप्न रंगवत शेतकरीराजा काबाडकष्ट करण्यास तयार आहे
“” नको कर्ज,नको कर्जमाफी नको अनुदान, नको नासाडी हे देवा दे माझ्या घामाची दाम
दे देवा माझ्या लेकरांना
कष्टाची पोटभरूनी भाकर
असं म्हणत आकाशाकडे बघत जणू की काय ईश्वराला विनंती करत आकाशाकडे डोळे लावून बसल्या सारखे दिसून येत आहे.
या राजाची विनंती लवकरच ईश्वर शिवकारेल आणि मृग नक्षत्राचा जोरदार मोठा पाऊस होईल शेतकरी राजा मोठया उत्साहाने कामाला लागेल पण सध्या तरी फक्त कोरडे वारे वाहत असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून राहिला आहे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे दिसून येत आहे.

About The Author

error: Content is protected !!