पंतप्रधान मोदी यांनी जनतेचा आत्मविश्वास निर्माण केला – बाळासाहेब पाटोदे
भाजपा युवा मोर्चा च्या विकास रथ बाईक रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत
उदगीर (प्रतिनिधी) : भारत देशाचे पंतप्रधान आणि संपूर्ण जगातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते तथा देशाचे पंतप्रधान यांनी तब्बल आठ वर्ष विकासात्मक कामे करून पूर्ण केली आहेत. त्या कामाची आठवण लोकांना व्हावी, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा विकास रथ बाईक रॅलीचे उदगीर तालुक्यात स्वागत करण्यात आले. उदगीर तालुक्याच्या सीमेवर पिंपरी येथून या रॅलीचे स्वागत करत उदगीर शहरात आणण्यात आले. उदगीर शहरात आल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या रॅलीचे स्वागत केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित विकास बाईक रॅली संपूर्ण जिल्ह्यात जाणार असून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे येणार आहे. याप्रसंगी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांच्या सूचनेनुसार आपली संपूर्ण टीम घेऊन या विकास रॅलीचे स्वागत केले. स्वागत प्रसंगी बोलताना युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी स्पष्ट केले की भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणूस गोरगरीब जनता यांच्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांना सन्मानाने जगता यावे हा दृष्टिकोन समोर ठेवून विविध योजना राबवल्या ज्या वेळेस सर्वसामान्य माणसावर संकट आले त्यावेळी त्यांच्या चुली पेटल्या पाहिजेत यासाठी मोफत धान्य वाटपाची योजना भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोक कल्याणकारी योजना राबवण्याचे सरकार आहे हे दाखवून दिले असेही युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी सांगितले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल नागनाथ निडवदे, संजय मामा पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड ज्ञानेश्वर चेवले, सरचिटणीस तानाजी बिराजदार, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, अमोल भालेराव, राजकुमार पाटील, नवज्योत भैय्या शिंदे, पुंड कृष्णा पाटील, पांडुरंग कांबळे, श्याम कांबळे, आनंद बुंदे, संतोष भालेराव, नागनाथ वाघमारे, बालाजी फड, अक्षय घोरपडे, अमोल अनकले, सूर्यवंशी विकास, पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या उत्तराताई कलबुर्गे यांच्यासोबत भाजपा, युवा मोर्चा, महिला आघाडी प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विकास रथाच्या निमित्ताने उदगीर शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले दिसून आले
