फुले महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

फुले महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या अभ्यास केंद्रात शिव स्वराज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या शिवस्वराज्य स्थापना दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर इतिहास विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास केंद्राचे संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी तर आभार डॉ. सतीश ससाने यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!