प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांची महात्मा फुले महाविद्यालयाच्या मूल्यमापन केंद्रास भेट

प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांची महात्मा फुले महाविद्यालयाच्या मूल्यमापन केंद्रास भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा माजी परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन केंद्राचे संचालक आणि कै. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणीचे प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी नुकतीच अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या तालुकास्तरीय पेपर मूल्यमापन केंद्रास भेट अचानक भेट देऊन समाधान व्यक्त केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उन्हाळी २०२२ परीक्षेच्या अहमदपूर तालुकास्तरीय पेपर मूल्यमापन केंद्र महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथे भेट दिली. पेपर मूल्यांकनाचे काम उत्तर चालू असल्याने समाधान व्यक्त केले. तसेच प्राचार्यांच्या आग्रहास्तव महात्मा फुले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रासही भेट देऊन परीक्षा सुरळीत सुरू असल्या बाबतही समाधान व्यक्त करून मूल्यमापन केंद्रही सर्व सुविधांनी युक्त असल्याबद्दल समाधान व्यक्त केले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ.डी.डी.चौधरी, मूल्यांकन केंद्र प्रमुख ह.भ.प.अनिल महाराज मुंढे, सहकेंद्रप्रमुख डॉ.सतीश ससाणे, लिपीक अजय मुरमुरे, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे, प्रशांत डोंगळीकर, यांच्यासह परीक्षा सहकेंद्रप्रमुख डॉ. अभिजीत मोरे, डॉ.प्रशांत बिरादार, डॉ. एस. एच. गर्जे, वामन मलकापुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी हे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!