महात्मा गांधी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

महात्मा गांधी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी दुपारी 1-00 जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या निकालाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा एकूण निकाल* 96.98% लागला असून 9 विद्यार्थी विशेष प्राविण्य व 259 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत महाविद्यालयातून गायमुखे सुरज हा विद्यार्थी 83.50% गुण घेऊन सर्वप्रथम आला तर सिद्दीकी हुसना (78.17%) सर्व द्वितीय व गोरटे गायत्री(77.67%) सर्व तृतीय आले आहेत. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 98.42% लागला असून 32 विद्यार्थी विशेष प्राविण्य व 137 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत 91.50% गुण घेऊन रत्नपारखे वैष्णवी सर्व प्रथम, चामले प्रिती (88.00%) सर्व द्वितीय व वालावार भगवंत (87.33%) सर्व तृतीय आला आहे. तर 80.00% पेक्षा अधिक गुण 14 विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. कला शाखेचा एकूण निकाल 89.69% लागला असून 03 विद्यार्थी विशेष प्राविण्य व 36 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कला शाखेत 83.17% गुण मिळवून राठोड माधव हा विद्यार्थी सर्व प्रथम आला आहे तर सुरवसे वर्षा (82.83%) सर्व द्वितीय व केंद्रे धनश्री (80.00%) सर्व तृतीय आली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा अॅड किशनराव बेंडकुळे, सचिव मा अॅड पी. डी. कदम, सहसचिव मा. अॅड वसंतराव फड, सदस्य मा. सुरेशराव देशमुख, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य कॅप्टन श्रीमती डाॅ. अनिता शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते मा. महेश देवणे, उपप्राचार्य पी. बी. बाभूळगावकर, पर्यवेक्षक प्रा. जे. पी. कुलकर्णी, प्रा. ए. एन. शिंदे, सीईटी सेल प्रमुख प्रा. डी. आर. कदम, कार्यालयीन अधीक्षक श्री. एस. बी. सूर्यवंशी, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!