यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाद्वारे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दिनांक 08 जून 2022 रोजी लागला असून विज्ञान शाखेचा 98.26 टक्के तर कला शाखेचा 98.63 टक्के निकाल लागला असून यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 98.40% लागला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातून मार्च 22 मध्ये विज्ञान शाखेतून एकूण 115 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 113 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष प्रवीण्यामध्ये 5, प्रथम श्रेणीत 45, द्वितीय श्रेणीत 61, विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 2 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा एकूण निकाल 98.26 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून साठे वैष्णवी संजय 81 टक्के गुण घेऊन प्रथम आली असून मुस्तापुरे मोहिनी गुरुनाथ 80 टक्के गुण घेऊन द्वितीय, खाटीक सानिया नईम 78 टक्के गुण घेऊन तृतीय आली असून कला शाखेतून एकूण 73 मुले परीक्षेस बसले होते त्यापैकी 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्यासह 1, प्रथम श्रेणीत 22, द्वितीय श्रेणीत 46 तर तृतीय श्रेणीत 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून काळे अमृता मोहन 76 टक्के गुण घेऊन प्रथम, कांबळे निकिता दयानंद 75 टक्के गुण घेऊन द्वितीय तर शेख नाजिया गफार 71 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. तर बैकरे प्रियंका दत्तात्रय ही पाली विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तर व्यावसायिक शिक्षणाच्या एच. एस. सी. व्होकेशनल विभागाचा 97 टक्के निकाल लागला आहे.
सदरील यशाबद्दल संस्था सचिव दलित मित्र, शिक्षण महर्षी डी. बी. लोहारे गुरुजी, महाविद्यालयाचे प्राचार्य गंपले व्ही. व्ही., उपप्राचार्य गोडभरले बि.के., विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक पुणे रवीकुमार, कला विभाग प्रमुख प्रा. ननीर एस. आर., परीक्षा विभाग प्रमुख डाॅ. कारामुंगीकर बालाजी, प्रा. सय्यद एम. यू., प्रा. चिद्रे शिवशंकर, प्रा. शिवशंकर पाटील, प्रा. येलमटे सुरेंद्र, प्रा. चवळे अनिल, प्रा. श्रीशैल्य मलशेट्टे, युवराज पाटील, योगेश बिरादार यांनी अभिनंदन केले आहे.
