अश्लिल व्हिडीओ काढून १५ लाखांची खंडणी उकळली, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : एका महिलेने स्वताचे एका इसमासोबत अश्लील चित्रीकरण साथीदाराच्या सहाय्याने करून त्या इसमा कडून धमकी देत पंधरा लाख रुपये खंडणी वसूल केल्याची घटना घडली आहे.
शहरातील भारत काॅलनीत राहणारी रूपाली ढगे व इतर दोघांनी उदगीर तालुक्यातील सुकणी येथील शेतकरी विठ्ठल दिगंबर मुळे ७२ वर्ष यांची माहिती काढून आपल्या खंडणीचा सावज शोधला.मागील महिन्यात ते विठ्ठल मुळे यांच्या शेतात गेले व त्यांना मद्य पाजले, दरम्यान अश्लील चित्रीकरण केले.या नंतर ५ मे ते १५ जुन पर्यंत आरोपी असलेल्या दोन इसमांनी आम्ही पोलिस आहोत व तुझ्या विरोधात बलत्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देत पहिल्या वेळी १० लाख, दुस-या वेळी ४ लाख असे एकूण १४ लाख रूपये मौजे सुकणी, शिरुर ताजबंद व तळेगाव रोड अहमदपूर या ठिकाणी ही खंडणी वसूल केली.या संदर्भात आरोपी महिला व तिचे साथीदार पुन्हा वेळोवेळी पैशांची मागणी करीत राहिल्याने फसवणूक झालेल्या इसमाने अहमदपूर पोलिस स्टेशनला माहिती दिली.आरोपींनी १५ जुन रोजी दोन लाख आणण्याची मागणी केली परंतु एक लाख द्यावयाचे ठरले व त्या प्रमाणे अहमदपूर बस स्थानकात दुपारी चार वाजता ठरलेला व्यवहार करीत असताना पोलीसांनी आरोपीस रंगेहात पकडले असून या संदर्भात बुधवारी रात्री उशीरा अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
या घटनेचा पोलिस उपविभागीय अधिकारी बलराज लंजीले, पोलिस निरीक्षक चितंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र केदार तपास करीत असून मुसा शेख यास व्यवहार करताना तर रूपाली ढगे हीस काळेगाव रोडवरून अटक करण्यात आली असुन तिसरा आरोपी गुलाबसाब शेख फरार आहे.
