भारताला सापडला कोहिनूर गावात हिरा – उमेश जमादार यांचा जंगी सत्कार
कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : थायलंड येथे संपन्न झालेल्या दक्षिण एशियन कुस्ती स्पर्धा 2022 स्पर्धेत कोहिनूर ता,बसवकल्याण जि. बिदर येथील उमेश बाबुराव जमादार या मल्लाने मिळवला सुवर्णपदक यामुळे त्याचं सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत वसलेल्या कोहिनूर या गावचा सुपुत्र गरीब घराण्यातला, बेडर समाजाचा, खेडेगावातील लाल मातीत खेळणारा हा पट्ट्या आपल्याकडील असलेली खेळाची कला दाखवत परदेशात जाऊन जन्मदात्या आई-वडिलांची, समाजाचे, भारत मातेचे नाव गौरवन्वित करून मान उंचावल्या बद्दल जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी कडून सुवर्णपदक विजेता उमेश बाबुराव जमादार यांचा भेट घेऊन शाल, फेटा, श्रीफळ व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची प्रतिमा भेट देऊन जंगी स्वागत सत्कार करण्यात आले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना चे राज्य कार्यकारिणी सदस्य बालाजी मिलगीरे, जिल्हा अध्यक्ष भास्कर पाटील, मेजर मोहन कर्णे, उमेश बुकले, सायबा कानडे, रामलिंग भोगिले, रवींद्र येपाळे, व अन्यजण उपस्थित होते.
उमेश याने सद्या दावनगिरा येथील ए, आर, जी, कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत अवघ्या 21 वर्षात 65 किलो वजन गटात चूरशीची कुस्ती खेळत विजय होऊन सवर्ण पदक असील केला आहे त्यामुळे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यामध्ये संघटनेच्यावतीने ही अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
