उदगीर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन, देऊळवाडी सोसायटीच्या विजयी उमेदवाराचा सत्कार संपन्न

उदगीर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन, देऊळवाडी सोसायटीच्या विजयी उमेदवाराचा सत्कार संपन्न

उदगीर : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्ह्यात मनसेने जोरदार तयारी चालू केली असून 14 जून रोजी लातूर शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच 16 जून रोजी उदगीर विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले तसेच संतोष भाऊ यांच्या हस्ते देऊळवाडी सोसायटीच्या ताब्यात घेणाऱ्या पॅनल प्रमुख माधव देवकत्ते, संग्राम केंद्रे सह विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी संतोषभाऊ नागरगोजे यांनी आपले मत व्यक्त करताना उदगीर विधानसभेत देऊळवाडी सोसायटीच्या विजय भविष्यातील यशाची सुरुवात झाली असून आगामी नगरपालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचे आव्हान सर्व महाराष्ट्र सैनिकांना केले पक्ष या निवडणुकात सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही दिले हे कार्यालय जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या पुढाकारातून उघडण्यात आले असून या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यात पक्ष बांधणी मजबूत करून सर्व निवडणुका पक्ष सक्षमपणे सामोरे जावु तसेच उदगीर विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले या कार्यालय उद्घाटन प्रसंगी रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष सचिन शिरसाट उदगीर तालुका अध्यक्ष संग्राम रोडगे, जळकोट तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टी , उदगीर शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी तालुका उपाध्यक्ष गुरुदत्त मनसे गंगाधर पितळे,संग्राम केंद्रे शहर सचिव अमोल गाजरे, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे , लखन पुरी मनविसे तालुकाध्यक्ष रामदास तेलंगे,शहराध्यक्ष दिनेश पवार, व्यापारी सेना जिल्हा उपाध्यक्ष विजय देबडवार, बालाजी धोत्रे, परमेश्वर भोसले,विष्णू अंधारे,उमेश तेलंगे, तुषार बुलबुले आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!