महापूर सोसायटीवर दिलीप माने यांच्या विकासरत्न लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

महापूर सोसायटीवर दिलीप माने यांच्या विकासरत्न लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

१३ पैकी १२ जागेवर दणदणीत विजय; शेतकरी विकास सहकारी पॅनलचा दारुण पराभव

लातूर (प्रतिनिधी) : महापूर सोसायटीवर विद्यमान चेअरमन दिलीपराव माने यांच्या विकासरत्न लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १२ जागेवर दणदणीत विजय मिळवत शेतकरी विकास सहकारी पॅनलचा दारुण पराभव करत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

महापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे साठी दि. १७ जुन रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. या मतदान प्रक्रियेनंतर लागलीच मतमोजणी करण्यात आली. एकूण ४९५ मतदार आहेत त्यापैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २८ मते अवैध ठरवण्यात आली. या निवडणुकीत महापूर येथील विद्यमान चेअरमन दिलीपराव माने यांच्या नेतृत्वाखालील विकासरत्न लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १२ जागेवर दणदणीत यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

महापूर सोसायटीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: माने दिलीपराव चंदरराव – (३००), ढमाले बाबुराव ज्ञानोबा – (२७२), नांगराळे गोविंद दतात्र्य – (२५७), भंगे सुरेश रामप्पा – (२६६), भांदरगे रंगनाथ भगवान – (२८५), माने हरिदास शिवराम – (२८४), मोहिते दतात्र्य रामराव – (२८४), राजे संजय उत्तमराव – (२८९), जाधव शांताबाई हरिदास – (३०३), मोरे गयाबाई नरसिंग – (२९१), बनसोडे विक्रम सिताराम – (३१०), आलुरे विजयकुमार सोपान – (३१९) सर्व विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!