लातूर मोबाइल रिटेल एसोसिएशनचे भव्य रक्त दान शिबीर संपन्न

लातूर मोबाइल रिटेल एसोसिएशनचे भव्य रक्त दान शिबीर संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : ऑल इंडिया मोबाइल रिटेल एसोसिएशन (AIMRA) व लातूर मोबाइल रिटेल एसोसिएशन (LMRA) च्या वतीने भव्य रक्त दान शिबीर घेण्यात आले. आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत लातूर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे. या रक्त दान शिबीरा मध्ये 94 पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

आरोग्य सेवेसाठी ऑल इंडिया मोबाइल रिटेल एसोसिएशन (AIMRA) व लातूर मोबाइल रिटेल एसोसिएशन च्या वतीने समाज कार्य करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. 94 पेक्षा जास्त युवा शिलेदारांनी रक्तदान केले. रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून लातूर जिल्ह्यात लातूर मोबाइल रिटेल एसोसिएशन यांनी रक्तसाखळी सुरू केली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महापौर विक्रांत गोजमगुंडे, भाजपा प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, विद्याताई पाटील, मोबाइल एसोसिएशन चे अध्यक्ष संजय गिल्डा, उपाध्यक्ष कीर्तिकुमार गटागट, संजय गिल्डा, कृष्ण गिल्डा, गोविंद शर्मा, प्रदीप राउत, महेंद्र पाटिल, रविशंकर जलकोटे, महफूज भाई, पवन सोमानी, रामजी चौधरी, आदि नि पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!