पु अहिल्यादेवी उच्च माध्यमिक चे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला आणि विज्ञान शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विज्ञान शाखेचे एकूण 82 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 30 विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीत 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ज्यामध्ये सुरज संतोष मुळे हा 84% घेऊन सर्वप्रथम तर गायत्री गोविंद पकाले ही 82.17% घेऊन द्वितीय तर अरविंद राजु चव्हाण हा 82% घेऊन तृतीय आले.तसेच कला शाखेत 78 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ज्यामध्ये सर्वप्रथम महानंदा माणिकराव हाके ही 81.67% घेऊन सर्वप्रथम तर अंबिका नामदेव काडवादे ही 80.33% घेऊन द्वितीय आली आहे.एकंदरीत विज्ञान शाखेचा निकाल 99% व कला शाखेचा निकाल 96۔15% लागला.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके,संस्थेचे सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांनी केले.
