महात्मा फुले महाविद्यालयात राजमाता जिजाऊंना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात राजमाता जिजाऊंना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले. यावेळी प्रो.डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!