पु अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचे एकूण 63 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी तब्बल 25 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर 27 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 9 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतून सय्यद सानिया शमशोद्दीन ही विद्यार्थिनी 88.20% घेऊन सर्वप्रथम आली तर 86.60% घेऊन देवकते मधूसुदन विठ्ठलराव सर्वद्वितीय आला तर पठाण रमजान मौला हा 86.40% घेऊन तृतीय आला. तसेच दुर्गे सुहानी भगवान हिला 85.80,पिंपळे दिपाली दत्ता 84.80, पाटील नचिकेत भिमाशंकर आणि मेकले मोहित माणिक यांनी प्रत्येकी 84.40% गुण घेऊन यश संपादन केले. तर शाळेतून 15 विद्यार्थी 80% पेक्षा जास्त गुण घेऊन निकालाची परंपरा कायम राखली. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन तथा कौतुक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांनी केले तर यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.
