संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे एमटीएस परीक्षेत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता पहिली वर्गातून राज रमेश पवार राज्यात तिसरा,गार्गी चंद्रशेखर नळेगावकर व श्रावणी हरिदास भांडे यांनी 300 पैकी 282 गुण घेऊन पाचवी वर्गातून राज्यात सातवा क्रमांक मिळवला आहे.गौरवी संदीप इप्पर, राज रमेश पवार व आदित्यराज गोपाल राठोड राज्यात आठवा आले आहेत. अभिजीत कपिलेश्वर ढोले राज्यात नववा, श्लोक सचिन बुजारे व प्रतीक माधव नायनवाड राज्यात दहावा आहे. वर्ग दुसरी तून श्रेयश अमोल देशमुख केंद्रात पहिला राज्यात नववा, समर्थ शिवानंद मंगनाळे केंद्रात दुसरा राज्यात तेरावा तर वर्ग तिसरी तून देवेंद्रसिंह दशरथ लोहकरे केंद्रात पहिला, ज्ञानेश्वरी रमेश सूर्यवंशी केंद्रात दुसरी अनुष्का बाबुराव नेळगे केंद्रात तिसरी असून वर्ग चौथी मधून अमृता महादेव यरबले केंद्रात तिसरी राज्यात 26 वी सृष्टी वैजनाथ सूर्यवंशी केंद्रात पाचवी वर्ग पाचवी तून श्रीजल बालाजी नवलागिरे केंद्रात दुसरी राज्यात बारावी जिल्ह्यात दुसरी, सानिका भानुदास खुर्दळे केंद्रात तिसरी राज्यात अठरावी जिल्ह्यात पाचवी, तन्वी मनोजकुमार पस्तापुरे केंद्रात चौथी राज्यात एकोणिसावी वर्ग सहावीतून नैतिक ज्ञानोबा उगिले केंद्रात तिसरा राज्यात सोळावा आला आहे या यशाबद्दल विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षक शबाना शेख, त्रिगुणा मोरगे, अश्विनी घोगरे, संजीवनी गुरुमे, शारदा तिरुके, सविता पाटील, सतीश साबणे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य रेखाताई तरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
