अहमदपूर चाकूर तालुक्यातील साठवण तलावांसाठी १५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी!
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर – चाकूर तालुक्यांतील साठवण तलावांसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून मतदारसंघातील तब्बल साठवण तलावांसाठी १५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देत निविदा काढण्यात आलेल्या आहेत. याबद्दल राज्य शासनाचे आणि मृदा व जलसंधारण मंत्री .ना शंकररावजी गडाख यांचे आभार आमदार यांनी मानले आहेत. मंजुर झालेल्या कामांची यादी खालील प्रमाणे आहे. बावलगाव गेटेड सिनाबां ता. चाकूर : ६५ लक्ष रुपये मोघा कोपबं ता.अहमदपूर : १ कोटी ५३ लक्ष रुपये थोडगा कोपबं ता.अहमदपूर : १ कोटी ४७ लक्ष रुपये थोट सावरगाव गेटेड सिनाबां क्र. १,२ ता. अहमदपूर : १ कोटी ५ लक्ष रुपये वळसंगी गेटेड सिनाबां क्र. १,२ ता. अहमदपूर : ९४ लक्ष रुपये हाडोळती गेटेड सिनाबां क्र. १,२ व कुमठा गेटेड सिनाबां क्र. १,२ ता. अहमदपूर : २ कोटी १२ लक्ष रुपयेअंधोरी गेटेड सिनाबां क्र. १,२ अंधोरी गेटेड सिनाबां क्र. १,२ ता. अहमदपूर : ९६ लक्ष रुपये चिलखा गेटेड सिनाबां क्र.१ व गोथाळा गेटेड सिनाबां क्र.१,२ ता. अहमदपूर : १ कोटी ४९ लक्ष रुपये सताळा गेटेड सिनाबां क्र. १,२ ता. अहमदपूर : १ कोटी ७ लक्ष रुपये तेलगाव गेटेड सिनाबा क्र. १ व वायगाव गेटेड सिनाबां क्र. १ ता. अहमदपूर : १ कोटी रुपये उन्नी गेटेड सिनाबां क्र.१ ता.अहमदपूर : ४७ लक्ष रुपये गुंजोटी गेटेड सिनाबां क्र.१ ता.अहमदपूर : ४७ लक्ष रुपयेटाकळगाव गेटेड सिनाबां क्र.१ ता.अहमदपूर : ४७ लक्ष रुपये
