श्रीनाथ हॉस्पिटल येथे दोन दिवस पहिला, दुसरा, बुस्टर डोस लसीकरण शिबीर

श्रीनाथ हॉस्पिटल येथे दोन दिवस पहिला, दुसरा, बुस्टर डोस लसीकरण शिबीर

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील श्रीनाथ हॉस्पिटल येथे दोन दिवस सर्वांनासाठी पहिला, दुसरा, बुस्टर डोस लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि.17 ते 18 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत लसीकरण सुरू राहील, पात्र नागरिकांनी केंद्रावर गर्दी न करता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.17 ते 18 जून पर्यंत सर्व व्यक्तीसाठी कोविडचा पहिला, दुसरा, बुस्टर डोस लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कोवीशिल्ड व कोव्हक्सीन या लसीचा नागरिकांना पहिला व दुसरा, बूस्टर डोस संबंधित लसीकरण शिबिरात उपलब्ध करण्यात आलं आहे. लसीकरण केंद्रावर पहिला व दुसऱ्या, बूस्टर डोस साठी पात्र असलेल्या नागरिकांनी डॉ.संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत लसीकरण करून घ्यावे. ज्या व्यक्तीने कोविड लसीकरण करून घेतले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे व संभाव्य कोविड साथीचा बचाव करावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!