कु. प्रियंका गोविंद भगत या विद्यार्थीनीला दहावीत ९५.४० टक्के गुण मिळाल्याबद्दल सत्कार

कु. प्रियंका गोविंद भगत या विद्यार्थीनीला दहावीत ९५.४० टक्के गुण मिळाल्याबद्दल सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावण्याची कामगिरी किनगाव ता अहमदपूर येथे प्राध्यापक असलेले कुणबी मराठा संघटनेचे तालुका अध्यक्ष गोविंद भगत यांच्या मुलीने केली आहे. प्रियंका गोविंद भगत असं दहावीत ९५ .४० टक्के गुण मिळवलेल्या मुलीचं नाव आहे. तिने दिवस-रात्र अभ्यास करून वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचंय. इयत्ता दहावीत शिकत असताना आईने प्रियंकाला घरातील कामं सांगितली नाहीत. या उलट त्यांनी तिला अनेकदा मदतच केली. प्रियंका वडीलांना एकुलती एक असल्यामुळे त्या गोष्टीचा कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट धरला नाही, तिच्या वडिलांनीही शिक्षणाच्या बाबतीत तिला काही कमी पडू दिलं नाही. सकाळी साडेचारला उठणे आणि अभ्यास करणे तसेच विद्यालयात जाऊन पुन्हा घरी आल्यानंतर अभ्यास करणे असा तिचा दिनक्रम असायचा. आई रंजना यांचं बारावी तर वडील यांचं एम.ए बी.एड पर्यंत शिक्षण झालेले असून ते अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील नेताजी शुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे ते दोघे ही शिक्षणाचं महत्त्व जाणतात. प्रियंकाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असून नामवंत डॉक्टर व्हायचं आहे, असं प्रियंका म्हणाली. शिक्षणात मुलींना कितीही सामाजिक तसेच आर्थिक अडचणी आल्या तरी मुलींनी शिकलं पाहिजे असं तिच्या आईचं म्हणणं आहे. वडीलांना ती एकुलती एकच मुलगी असुन प्रियंकाला भाऊ नाही त्यामुळे मुला पेक्षाही मुलगी उंच भरारी घेऊ शकते व वडीलाचे नाव आणखी मोठे करून पुढील आयुष्यात आणखी उंच भरारी प्रियंकाला घ्यायची आहे. या तिच्या यशाबद्दल मित्र परिवाराच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले गोपीनाथ जायभाये, सहशिक्षक गजानन हाडोळे, सामाजिक कार्यकर्ते राम जायभाये, पत्रकार गोविंद काळे आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!