शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बळीराजा विद्यालय गंगाहीप्परगा शाळेचे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : मौ.गंगाहिप्परगा ता अहमदपूर जि लातूर येथील बळीराजा विद्यालयाचा 100% निकाल लागला तसेच गावातील सर्व नागरीक, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पोलिस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विद्यार्थ्यांना व शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मार्च 2022 एसएससी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागला असून विशेष प्रावीन्यासह 14 विद्यार्थी उतीर्ण. शाळेतून 93%गुण घेऊन कु. कदम श्रुती हणमंत ही प्रथम आली. 92%गुण घेऊन कु.कदम वैशाली व्यंकट ही द्वितीय आली. 88.80%गुण घेऊन ची. चामवाड संभाजी रविंद्र हा तृतीय व मुलात प्रथम आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शिवगंगाताई कदम, सचिव प्रा.गलाले सर ,मुख्याध्यापक शेकडे सर, स.शि.कदम सर, कांबळे सर, सुरकुटे सर, थगनर सर, सूर्यवंशी सर, सोगेवाड मोहन, सौ. बेंबडे मॅडम व समस्त गावकरी मंडळी यांनी केले.
