सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, रुद्धा ता अहमदपूर येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त संचालक कुलदीप हाके व संचालिका शिवालीका हाके यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढय आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर संस्कार करीत होत्या व शस्त्रविद्येत त्यांना निपुण करतांना दादोजी कोंडदेवांसोबत स्वतःदेखील बारकाईने लक्ष ठेवत होत्या. शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हां कैद झाली होती त्यावेळी उतारवयात देखील जिजाउं माॅं साहेबांनी राज्याची जवाबदारी अतिशय समर्थपणे पेलली.असे कुलदीप हाके यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य ऋत चक्रणारायानं, शुभांगी सूर्यवंशी, संग्राम कोपनर, मंगेश चव्हाण व पालक आणि विध्यर्थी उपस्थित होते.
