श्यामलाल हायस्कूलचे एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश,100%गुणांचे दोन मानकरी !

उदगीर : येथील श्यामलाल स्मारक विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत १००% गुण घेऊन दोन विद्यार्थ्यांनी श्यामलाल हायस्कुलच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अतिशय उज्ज्वल यश संपादन करून हायस्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम कायम ठेवली आहे.विद्यालयातील नादरगे इंद्रजीत चंद्रदीप व मुंढे मंगेश गोरखनाथ या विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 98.40% इतके गुण घेऊन नादरगे विश्वजित चंद्रदीप द्वितीय क्रमांकावर तर 97.60% गुणांसह पाटील धनश्री व पाटील स्वराज हे तृतीय क्रमांकावर आहेत.
विशेष प्राविण्यासह 195 विद्यार्थी उत्तीर्ण झालेआहेत ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. तर प्रथम श्रेणी 74 विद्यार्थी,द्वितीय श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालायचा निकाल 99.64%आहे.
सर्व यशवंतांचे माननीय संस्था अध्यक्ष अॅड सुपोषपाणि आर्य,उपाध्यक्ष गिरीश मुंडकर,सचिव अॅड विक्रम संकाये,सहसचिव अंजुमणिताई आर्य तसेच प्राचार्य आनंद चोबळे व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
