आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी योग विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा
उदगीर (प्रतिनिधी) : धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,उदगीरच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य व आरोग्य सर्वांसाठी या संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन-सप्ताह निमित्ताने उदगीर शहरातील इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी योग या विषयावर 30 बहुपर्यायी प्रश्नांची व 30 मिनीटांची प्रश्नमंजुषा स्पर्धा मंगळवार,दिनांक:-21 जून 2022 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 यादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदरील स्पर्धा त्यांच्या शाळेमध्ये आयोजित करण्यासाठी तांत्रिक संमती सोमवार,दिनांक:-20 जून 2022 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत साधारणतः स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची अंदाजीत संख्या याची माहिती खालीलपैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर व्हाट्सअपच्या माध्यमातून सुद्धा कळविली तर केवळ त्याच शाळांमध्ये येऊन(त्यांच्या परिसरात)एकाच वेळी स्पर्धा घेण्यात येणार आहे.
सदरील योग स्पर्धेसाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी कडून कोणतेही प्रवेशिका शुल्क घेण्यात येणार नाही.सदरील स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींमधुन प्रथम येणाऱ्या स्पर्धकास रु.551/_ व प्रशस्तीपत्र, द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास रु.451/_ व प्रशस्तीपत्र, तृतीय येणाऱ्या स्पर्धकास रू.351/_ व प्रशस्तीपत्र तथा प्रोत्साहनपर चतुर्थ व पाचव्या येणाऱ्या स्पर्धकास प्रत्येकी रु.251/_ व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी समान गुण मिळवल्यास त्यांची त्याच दिवशी पुन्हा 30 मिनिटांची व 30 बहुपर्यायी प्रश्नांची स्पर्धा घेण्यात येईल आणि त्यातूनच प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ व पाचवा क्रमांक निवडण्यात येईल.
तरी उदगीर शहरातील विविध शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपापल्या शाळेतील इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योग विषयक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील(9422819195),स्पर्धा समन्वयक डॉ.अविनाश जाधव(8788878711),सहसमन्वयक डॉ.सचिन टाले(9405048466),आंतरवासियता प्रशिक्षणार्थी प्रमुख डॉ मंगेश मुंढे(9423350673),राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.वैभव बिरादार(9890273347),डॉ.विशाल अनवले(9518966371),डॉ.मयुरी ठाकूर व योग तज्ज्ञ डॉ.सुरज बिरादार यांनी केले आहे.
