सामान्य माणसाचा आधारवड : माजी आ.सुधाकरराव भालेराव साहेब

सामान्य माणसाचा आधारवड : माजी आ.सुधाकरराव भालेराव साहेब

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभुषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श वैचारिक अधिष्ठानाला डोळ्यासमोर ठेवून राजकारण म्हणजे समाज हितासाठी समर्पित जीवन जगणे होय. समाजातील उपेक्षित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे होय. असा आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थ भावनेने तब्बल दहा वर्ष उदगीर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार सुधाकरराव भालेराव साहेब म्हणजे एक आदर्श नेतृत्वाचे उदाहरण होय.

लोक कल्याणकारी राज्य काय असते? हे दाखवून देण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला. मतदार संघात कित्येक विकास कामे केली. कर्मधर्मसंयोगाने घरून श्रीमंत असल्यामुळे भालेराव साहेबांना कधीही राजकारणातून पैसा कमवावा, असा मोह झाला नाही. त्यामुळे एक चारित्र्यसंपन्न, निष्कलंक राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आर्थिक भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर कोणी करू शकले नाहीत. हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे मोठेपण आहे. स्वतःचा स्वार्थ, जात, धर्म, प्रांत या सगळ्या संकुचीत गोष्टीच्या पलीकडे जाऊन भालेराव साहेबांनी राजकारण केले.

राजकारणात राहून निस्वार्थ भावना ठेवणारे माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब यांच्यासारखे नेतृत्व दुर्मिळ आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ लोककल्याणाची प्रचंड भावना आणि इच्छाशक्ती त्याच्या बळावर स्वकर्तृत्वावर दोन वेळा उदगीर विधानसभा मतदार संघातून प्रचंड बहुमताने सुधाकरराव भालेराव साहेब निवडून आले. आपल्यावर प्रेम करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील जनतेला त्यांनी भरभरून प्रेम दिले. त्यांच्याकडे संघटनकौशल्य असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन त्यांनी पूर्ण ताकतीने बांधले. त्यामुळेच लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची शक्ती वाढली.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवणारे लोक कल्याणकारी विचार डोक्यात ठेवून काम करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहता येऊ शकेल. कित्येक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय राहून देखील जवळ असणार्‍यांनी धोका दिला असतानासुद्धा त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष, मत्सर कधी दिसून आला नाही. श्रीमंती आणि सत्ता याचा गर्व हि त्यांना कधी जाणवला नाही. ते सर्व सामान्य माणसांमध्ये अगदी सहज मिसळू शकतात. त्यामुळे जन माणसाच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे.

त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यांचे काम झालेच पाहिजे. यासाठी त्यांचा अट्टाहास असतो. त्यामुळे त्या लोकांना साहेब आपले वाटतात. साहेब सतत राजकारणासाठी राजकारण नसून ते समाजकारणासाठी आहे. असा विचार घेऊन राजकारण करतात. कार्यकर्त्यांनाही तीच शिकवण देतात. जनतेची कामे झाली पाहिजेत, जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. अशी संकल्पना ते सतत मांडत असतात. दुर्दैवाने काही जवळच्या लोकांनी त्यांच्याबद्दल गैरसमज करून दिल्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत साहेबांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र लवकरच पक्षश्रेष्ठींच्या लक्षात भालेराव साहेब यांची कामगिरी आणि संघटन कौशल्य आले. त्यामुळेच महाराष्ट्र पातळीवर काम करण्याची संधी भालेराव साहेबांना पक्षाने दिली आहे.

आज साहेब महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला सदैव बळ मिळत जावो, यासाठी परमेश्वर त्यांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य देवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

बाळासाहेब पाटोदे
तालुकाध्यक्ष
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उदगीर तालुका जिल्हा लातूर.

About The Author

error: Content is protected !!