कोराळी रस्त्याचा नारळ कधी पुटणार हा संशोधनाचा विषय, जीवघेणा प्रवास कधी सुखरूप होणार ?

कोराळी रस्त्याचा नारळ कधी पुटणार हा संशोधनाचा विषय, जीवघेणा प्रवास कधी सुखरूप होणार ?

कोराळी (बालाजी मिलगीरे) : कोराळी ता.निलंगा या गावाची रस्ता अनेक वर्षांपासून अतिशय खराब झालेला आहे या रस्तेचा विषय अनेकदा चर्चा, मागणी करून सद्धा रस्तेचा काम होत नसल्याने रस्ता होणार की नाही हा संशोधनाचा विषय बनले आहे.

हा रस्ता महाराष्ट्र व कर्नाटक आशा दोन राज्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे येथे सीमावर्ती भागात मध्यभागी कासार सिरसी शहराचा मार्केट मोठा आसून त्यात दोन पेट्रोल पंप, ग्रामीण रुग्णालय, शाळा, कॉलेज,आठवडी बाजार,आडत मार्केट, असा मोठा बाजारपेठ असल्याने सीमा भागातील नागरिकांची या रस्त्यावरती वर्दळ आहे परंतु हा रस्ता अनेक वर्षांपासून खडयात खडा जशास तसे पडून राहिला आहे.रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचून चिखलमय झाल्याने अनेक मोटार सायकलव्यल्याना दुखापत झाले आहे या परिसरातील नागरिकांना काट्यावरची कसरत करावी लागत आहे हा जीवघेणा प्रवास किती दिवस करायचा, ह्या रस्त्यावरून सुखमय प्रवास कधी होणार, आकडे शासनाकडून दुर्लक्ष का केली जातोय आसा येथील जनता प्रश्न करत आहे .
येत्या पुढच्या महिन्या पासून पावसाळा चालू होतंय या काळात आणखीन रस्ता खराब होण्याची शक्यता आहे तसेच शाळा हे सुरू होतील त्यावेळेस शाळकरी बालकांना याचा त्रास होणार.

About The Author

error: Content is protected !!