नांदगाव सोसायटीवर विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलची एकहाती सत्ता

नांदगाव सोसायटीवर विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलची एकहाती सत्ता

१३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय; शेतकरी विकास पॅनलचा सुपडा साफ

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक दि.१८ जून रोजी पार पडली अतिशय महत्वपूर्ण ठरलेल्या या लढतीत विद्यमान चेअरमन सतिश कुलकर्णी व आनंद पाटील यांच्या विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलने १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत आपली एकहाती सत्ता तिसर्यांदा स्थापन केली आहे.

नांदगाव सोसायटीवर विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलची एकहाती सत्ता

नांदगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक दि. १८ जून रोजी पार पडली. सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली या मतदान प्रक्रियेनंतर लागलीच मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. या सोसायटीत एकूण ५७६ मतदार आहेत त्यापैकी ५१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण २९ मते अवैद्य ठरवण्यात आली. नांदगाव सोसायटी च्या निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलचे सर्व उमेदवार हे २०० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. या निवडणुकीत विद्यमान चेअरमन सतिश कुलकर्णी, आनंद पाटील, व्यंकट घोडके, रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलने १३ पैकी १३ जागेवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

नांदगाव सोसायटीतील विजयी उमेदवार : – कुलकर्णी सतिश नरसिंह – (३४९), पाटील आनंद रामराव – (३३४), पाटील दिलीप बाबुराव – (३२१), पाटील नंदकुमार भगवान – (३१६), घोडके व्यंकट ज्ञानोबा – (३२७), ढमाले भगवान शंकर – (३३०), ढमाले रामा बब्रुवान – (३३२), माने सिध्दाजी रामराव – (३२१), कळबंडे बळीराम मुरलीधर – (३६५), वाघमारे विष्णु विठ्ठल – (३६२), कांबळे मुरलीधर तुळशीराम (३६३), सौ. चिगुरे सुरेखा राजेंद्र – (३५४), श्रीमती जगताप चंद्रकला विठ्ठल- (३५४) हे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आसून विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!