विश्वाने भारतीय योगशास्त्राला विश्वासाने स्विकारले – डॉ. विठ्ठलसिंह परिहार

विश्वाने भारतीय योगशास्त्राला विश्वासाने स्विकारले - डॉ. विठ्ठलसिंह परिहार

अहमदपूर (गोविंद काळे) : मानवी जीवनात योगाचे महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये नियमित योगा केला तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सहज मिळू शकते. अशा या भारतीय प्राचीन शास्त्राला विश्वाने मान्यता दिली आहे.असे स्पष्ट प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर च्या क्रीडा विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रा प्रसंगी ते बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे गुरूजी हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्राचे उद्घाटन जर्मनी येथील योगशास्त्राचे अभ्यासक अश्विन आंबटकर यांनी केले.

तसेच आभासी पद्धतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दीपक बच्चेवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. परिहार म्हणाले की, जीवनात योगाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे माणसांनी आपल्या दैनंदिन जीवनातील काही वेळ आपल्या आरोग्यासाठी दिलाच पाहिजे. प्राचीन काळापासून योगाच्या आधारावर ऋषी मुनी, तत्त्वज्ञानी आदींनी शंभराहून अधिक वर्ष जीवन जगले. असेही ते म्हणाले. या चर्चासत्राच्या द्वितीय सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य व माजी क्रीडा संचालक डॉ. पी.एन. देशमुख यांनी तसेच हरिद्वार येथील पतंजली योग विद्यापीठाचे डॉ निदिश कुमार यादव यांनी मार्गदर्शन केले. तसेच शोध निबंध वाचनसत्राचे अध्यक्षस्थान ग्लोबल ह्युमन रीसर्च अँड वेल्फेअर सोसायटी ठाणेचे डॉ. बलवंत गोपाल सिंग यांनी भूषविले. या सत्रात डॉ. चरणजीत सिंग, डॉ. गौरी बेन पटोडिया, डॉ. जयशिला मनोहर व डॉ. अभिजीत सरनाईक यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शोधपत्राचे वाचन केले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. याप्रसंगी आभासी पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ह्यूमन लाइफ अँड योगा ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक प्रो. डॉ. अभिजित मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अतिश आकडे व डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार संयोजक प्रो. डॉ. अभिजित मोरे यांनी मानले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात आभासी पद्धतीने देश-विदेशातून दोनशेहून अधिक अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!