महात्मा फुले महाविद्यालयात आज योगावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

महात्मा फुले महाविद्यालयात आज योगावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उद्या दि. २१ जून २०२२ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, ‘मानवी जीवन आणि योगा’ या विषयावर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे भूषविणार असून, या चर्चासत्राचे उद्घाटन जर्मनी येथील योग अभ्यासक अश्विन आंबटवार हे करणार आहेत. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दीपक बच्चेवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठल सिंह परिहार यांचे बीज भाषण होणार आहे. त्या नंतर होणाऱ्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. पी. एन. देशमुख हे भूषविणार असून या सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉ. पतंजली योग विद्यापीठ हरिद्वार येथील डॉ. निदीश कुमार यादव हे उपस्थित राहणार आहेत. शोधनिबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान ठाणे येथील ग्लोबल ह्युमन रिसर्च अँड वेल्फेअर सोसायटीचे डॉ. बलवंत गोपाल सिंग हे भूषविणार आहेत. यावेळी डॉ. चंद्रजीत सिंग, डॉ. गौरी बेन पटोलिया, डॉ. अभिजीत सरनाईक आणि डॉ. जयशीला मनोहर हे अभ्यासक शोधनिबंध सादर करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व संयोजक क्रीडा संचालक डॉ. अभिजीत मोरे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!