ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीचे विद्यार्थी शहरात नव्हे तर जिल्ह्यात अव्वल

ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीचे विद्यार्थी शहरात नव्हे तर जिल्ह्यात अव्वल

लातूर (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात लातूर विभागाने गगनभरारी घेऊन लातूर पॅटर्नचा दबदबा कायम ठेवला आहे. दरम्यान, मागील २२ वर्षांपासून लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेल्या ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आपली चमक दाखवत , गुणवत्ता सिद्धकरत दैदिप्यमान यश मिळविले आहे. यावर्षी ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्या ६ विद्यार्थ्यांनी १०० पैकी तब्बल ९८ गुण, ७ विद्यार्थ्यांनी ९७ गुण, ६ विद्यार्थ्यांनी ९६ गुण मिळवून दहावीच्या इंग्रजी विषयात यशोशिखर गाठले आहे.

इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण देणारे ढगेज् कोचिंग क्लासेस हे लातूर शहरातील नामांकीत संस्था आहे. मागील तब्बल २२ वर्षांपासून लातूर शहरात आघाडीवर असलेल्या ढगेज् कोचिंग क्लासेस मधून प्रतिवर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडतात. अकॅडमीचे विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात घडून आघाडीवर आहेत. लातूर शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयासंदर्भात असलेली भीती, इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड दूर करण्यात अकॅडमीचे मार्गदर्शक प्राचार्य व्यंकटराव ढगे, संचालक प्रा. सचिदानंद ढगे, प्रा. विवेकानंद ढगे यांची मोलाची भूमिका आहे. प्रतिवर्षी अकॅडमीचे विद्यार्थ्यांना विविध परीक्षेत घवघवीत यश संपादन करत असतात. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात ॲकॅडमीच्या ६ विद्यार्थ्यांनी १०० पैकी तब्बल ९८ गुण, ७ विद्यार्थ्यांनी ९७ गुण, ६ विद्यार्थ्यांनी ९६ गुण मिळाले आहेत. तर ९० पेक्षा अधिक गुण घेणारे ९० विद्यार्थी आहेत त्याचबरोबर इंग्रजी विषयात ८० पेक्षा अधिक गुण घेणारे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी हे केवळ ढगेज् कोचिंग क्लासेसचे आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल अकॅडमीचे मार्गदर्शक प्राचार्य व्यंकटराव ढगे, संचालक प्रा. सचिदानंद ढगे, प्रा. विवेकानंद ढगे यांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्या प्रथमेश सूर्यवंशी, विवेक नागपुरे, आदित्य वागलगावे हरिप्रसाद सूर्यवंशी, साधना उंबर्गे, प्राची पाटे यांनी १०० पैकी ९८ गुण मिळविले आहेत. तर गार्गी ढगे, प्रतीक्षा पवार, स्नेहल जाधव, सायली गाडे, ऋषिकेश एकुरगे, ऋतुजा गोंड, आदित्य क्षीरसागर यांनी १०० पैकी ९७ गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!