नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित – बाळासाहेब पाटोदे

नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित - बाळासाहेब पाटोदे

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका लागू झाल्या आहेत. प्रभाग निहाय सदस्यांचे आरक्षणही निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पूर्ण तयारी केली असून येणारे निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या हातात राहील, याची खात्री आपल्याला आहे. असा विश्वास उदगीर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब
पाटोदे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोंधळ चालू असताना आता महाआघाडी शासन जाणार आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येणार , अशा पद्धतीच्या नुसत्या चर्चेमुळे उदगीर येथील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येतो आहे. कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस कडे प्रवेशासाठी युवकांच्या रांगा लागत होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली असून भारतीय जनता पार्टीमध्ये युवक वर्गाने मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे,करत आहेत. युवकांची या मोठ्या प्रमाणात प्रवेशाची घटनाच उदगीर नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील, याचे चिन्ह असल्याचेही बाळासाहेब पाटोदे यांनी या प्रसंगी जाहीर केले.
विधान सभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा माजी आमदार सुधाकर भालेराव सक्रिय होत असून त्यांनी लोक संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. अगोदरच संघटन कुशल असलेल्या माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी पुन्हा सक्रिय होणे, म्हणजेच यदाकदाचित मध्यावधी निवडणुका जरी लागल्या तरी आम्ही तयार आहोत. हे दाखवून देनेच होय, असेही युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी बोलताना स्पष्ट केले.
सद्यस्थितीत नगरपालिकेच्या प्रभाग निहाय रचना आणि आरक्षण यासंदर्भात बारकाईने निरीक्षण चालू असून योग्य आणि जनतेची सेवा करण्याची क्षमता असलेल्या पात्र उमेदवारांचा ही शोध चालू असून, गर्दी असली तरीही योग्यते प्रमाणे प्रभाग निहाय उमेदवारांची निवड केली जाईल. अशीही माहिती त्यांनी दिली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्‍चितपणे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार सुधाकररावजी भालेराव, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,शहर अध्यक्ष मनोज पुदाले आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी हे सर्व या प्रसंगी युवकांना प्राधान्यक्रम देतील. अशी खात्रीही त्यांनी बोलून दाखवली आहे.
नुकतेच युवक वर्गाने भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला असून त्यानुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या नवीन कार्यकारिणीची निवड ही माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांच्या सूचनेप्रमाणे नूतन कार्यकारणी मध्ये उदगीर तालुका युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष पदी पांडुरंग श्रीराम कांबळे आणि सहसंघटक सरचिटणीस पदी नागनाथ प्रकाश वाघमारे, तालुका सरचिटणीस पदी बाळू दत्ता फड, तालुका उपाध्यक्षपदी अजय वैजनाथ सूर्यवंशी, तालुका चिटणीस पदी बालाजी केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजय पाटील मलकापूरकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटदे,जवाहरलाल कांबळे, राजू सूर्यवंशी, नवज्योत शिंदे ,माधव टेपाले ,भारतीबाई सूर्यवंशी, स्वाती वट्टमवार, राम जाधव ,अमीर शेख ,लक्ष्मीकांत पाटील, आनंद भोसले, अक्षय घोरपडे, मंगेश यरकुंडे ,दीपक सूर्यवंशी, श्याम वाघमारे, धर्मेंद्र सूर्यवंशी, दिलीप गुलफुरे, नर्सिंग सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!