संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : आज परिवारातील सर्व सदस्यांना कामाचा मोठा व्याप झालेला आहे. त्यामुळे त्यांचे मानवी आरोग्याकडे लक्ष राहिले नाही. म्हणून योगासने प्राणायाम करा आणि मानवी वयोमान वाढवा व निरोगी जगा असे आग्रही प्रतिपादन योग शिक्षिका कलावती भातांब्रे यांनी केले त्या ८ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शनापर शिबीरात बोलताना व्यक्त केले. यावेळी योग पिठावर रंजना आंधळे, आशा आवाळे ,रेखा बालुरे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे, लिनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर सह मान्यवर उपस्थित होते .यावेळी योगासने, प्राणायाम , ध्यान योग या विषयी प्रात्यक्षिक कलावती भातांब्रे यांनी करून दाखवून मार्गदर्शन केले .प्रास्ताविक आशा रोडगे यांनी सूत्रसंचालन सतीश साबणे तर आभार संगीता आबंदे यांनी मानले. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व योग प्रेमी नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
