महात्मा फुले महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार डॉ. सतीश ससाने यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!