शहरातील विविध मागण्यांसाठी प्रादेशिक उपसंचालकाकडे दिले निवेदन

शहरातील विविध मागण्यांसाठी प्रादेशिक उपसंचालकाकडे दिले निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील नवीन नळ जोडणीचा प्रश्न,पाणी प्रश्न,प्रलंबीत कबालनामे, प्रलंबीत विविध प्रशासकीय मान्यता आदी विविध प्रलंबीत प्रश्ना संदर्भात औरंगाबाद येथील नगर पालिका प्रशासनाच्या प्रादेशिक उपसंचालक श्रीमती अँलीस पोरे मॅडम यांची युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी भेट घेवून या मागण्यांबाबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले असून प्रसंगी अंदोलनाचा ईशारा दिला आहे.

या बाबतीत अधिक माहिती अशी की,प्रामुख्याने शहरातील पाणी पूरवठा योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे मात्र अद्याप नागरीकांना मोफत नळ जोडणी दिलेले नाही. योजनेतील शिल्लक निधीतून शहरातील नागरिकांना मोफत नळ जोडणी करण्याची वेळो वेळी मागणी केली आहे मात्र नळ जोडणी प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबीत असल्याचे सांगण्यात येते.या बाबत मंत्रालय स्तरावर सूध्दा पाठपूरावा करून सूध्दा त्यास मंजूरी मिळत नाही.यातून नागरीकांना विनाकारण नळ जोडणीसाठी प्रत्येकी हजारों रुपये खर्च करावे लागत आहेत. ही गंभीर परिस्थीती शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणी शहरातील मौलाली नगर, उमर काॅलनी,इंदिरानगर, भीम नगर, बौध्द नगर, इदगाह रोड, पंचशील नगर,अण्णाभाऊ साठे नगर, मरशीवनी, मरनिवनी तांडा, इंदिरा नगर, भारत काॅलनी, अराफत काॅलनी, तिपन्ना नगर, बागवान काॅलनी, चारटांगी आदी ठिकाणी तातडीने मोफत नळ जोडण्या द्याव्यात. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध योजनेतील प्रलंबीत प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याबाबत निर्देश देण्यात यावे. तसेच वारंवार अंदोलने करून सूध्दा अहमदपूर येथील स.नं.4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय झाला.शासकीय मूल्यांकन भरून घेतले मात्र राजकीय भावनेने कबालनामे दिले जात नाहीत तेंव्हा पूढील दहा दिवसात तहसिल कार्यालयाने कबालनाम्यावर सही करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून तातठीने कबालनामे वाटप करावेत अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर येत्या दहा दिवसा नंतर तीव्र अंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आज औरंगाबाद येथे निवेदन देताना प्रत्येक प्रश्नांसंदर्भात अँलीस पोरे मॅडम यांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली.तसेच या प्रश्ना बाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबधीतांना दिल्या आहेत. दरम्यान आता प्रलंबीत कामासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सम्राट मित्र मंडळाच्या वतीने अंदोलनाचा ईशारा दिल्याने प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.

About The Author

error: Content is protected !!