ब्राईट स्टार शाळेने उदगीरचे शेक्षणीक क्षेत्रात नवलोकिक कमावले
उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर शहरातील ब्राईट स्टार हायस्कूल येथील दहावी बोर्ड परीक्षांमध्ये १०० टक्के गुण मिळवणाऱ्या ०३ विद्यार्थ्यांचे व ९० टक्के पेक्षा जास्त गुण असलेले सुमारे ३६ हून अधिक विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात शाल,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करत सत्कार केला. व उदगीरचे नावलोकिक केले,असे उद्गार ना.संजय बनसोडे यांनी काढले.
पुढे बोलतांना त्यांनी स्पश्ट केले की,आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवावा. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडा थोडा अभ्यास करा, खूप अडथळे येथील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा. असे यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ओलंपियाड स्पर्धे मध्ये सुवर्ण पदक मिळालेल्या ७० विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सत्कार केला.
याप्रसंगी ब्राईट स्टार हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष प्रा. वीरभद्र घाळे, उपाध्यक्ष तथा उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्ष डॉ. भाग्यश्री ताई घाळे, सचिव प्रा. सौ. प्रेमाताई घाळे व उदगीर येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
