सौ.अंजली घोळवे यांना पीएचडी प्रदान

सौ.अंजली घोळवे यांना पीएचडी प्रदान

उदगीर (प्रतिनिधी) : अंजली शेळकीकर घोळवे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून नुकतीच संगणक शास्त्र या विषयात एचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. सौ. अंजली शेळकीकर घोळवे यांनी संगणक शास्त्रात डिटेक्शन ऑफ मॅक्स व्हीलर इंडीमा थ्रू ऑपटिकल कोहरंसा टोमोग्रफी या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.
वरील संशोधनादरम्यान त्यांनी चार संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या संशोधनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉक्टर विकास हुंबे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ.रमेश मंझा यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ अंजली घोळवे या मुळ उदगीर येथील रहिवासी आहेत. त्या जिल्हा परिषदेचे शिक्षक नामदेवराव मुंडे यांच्या कन्या तर लातूर येथील चन्ना बसवेश्वर औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. डॉ. सचिन घोळवे त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत. श्यामलाल स्मारक मेमोरियल हायस्कूल उदगीर येथे माजी उपप्राचार्य राहिलेल्या भागवतराव घोळवे यांच्या त्या सून आहेत.आंजली घोळवे यांच्या या यशाबद्दल घोळवे आणि मुंडे परिवारातील व मित्र मंडळी च्या वतीने त्यांचे कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!