विकास मंडळास मुदतवाढी बद्दल तत्कालीन सरकारचे आभार
उदगीर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठवाडा जनता विकास परिषदेच्या उदगीर शाखेच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि मंत्रिमंडळातील तत्कालीन राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत. अशी माहिती मराठवाडा जनता विकास परिषद उदगीरचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठवाडा वैधानिक विकास मंडळस मुदतवाढ मिळण्यासाठी हा प्रश्न मराठवाडा जनता विकास परिषदेने लावून धरला होता. गेल्या दोन वर्षापासून केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या सूचनेनुसार धरणे आंदोलन, निवेदने या मार्गाने आंदोलने ही करण्यात आले होते.
मंडळास अनुशेषाचा अभ्यास करून शिफारशी करता येतात व निधीचे समन्वय त्या दृष्टीने वाटपाचे अधिकार असल्याने त्यास महत्त्व प्राप्त आहे. या निर्णयामुळे या भागातील विकास प्रक्रियेला चालना मिळू शकते. अशा आशयाचे पत्रकच अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया, ,उपाध्यक्ष प्रा एस एस पाटील ,सचिव प्रा.प्रवीण जाहूरे, कोषाध्यक्ष महादेव खताळ, बाबुराव माशाळकर, दीपक बलसुरकर, मुरलीधर जाधव ,माधव कल्याणकर ,रामभाऊ मोतीपवळे यांनी प्रसिद्ध दिले आहे.
