भाजपला अच्छे दिन, महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरात सध्या राजकीय वारे वेगळेच वाहू लागले आहे. सत्तांतर झाल्याबरोबर भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आले आहेत. एक तर माजी आमदार सुधाकर भालेराव हे सक्रिय झालेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्याने हिंदुत्ववादी विचारधारेच्या महिला आणि युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचा सपाटात लावला आहेत.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उदगीर शहरातील अशोक नगर भागातील भारतीबाई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी उदगीर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, भाजपाचे लातूर जिल्हा सरचिटणीस श्रद्धाताई जगताप, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा लातूरचे प्रभारी अमर बोऱ्हाडे, माजी नगरसेवक आनंद बुंदे, युवा मोर्चा शहराध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, तालुका सरचिटणीस नवज्योत शिंदे, मंगेश यरकुंडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी या प्रभागातील महिलांनी आपण माजी आमदार सुधाकररावजी भालेराव, युवा मोर्चाचे नेते बाळासाहेब पाटोदे आणि श्रद्धाताई जगताप यांच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. महिला आणि युवकांच्या पक्षप्रवेशाने निश्चितच शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व वाढणार आहे. अशी चर्चा राजकीय जाणकार करत आहेत.
