नवसंजीवनी देणाऱ्या देवदूतांचा संजीवनी मेडिकलच्या वतीने सन्मान

नवसंजीवनी देणाऱ्या देवदूतांचा संजीवनी मेडिकलच्या वतीने सन्मान

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त अहमदपूर येथील युवा औषध विक्रेते संजीवनी मेडिकलचे श्रीधर सांगुळे पाटील यांनी माणसातील देवांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याप्रती अहमदपूर येथील डॉक्टर्स चा सन्मान सोहळा दि १ जूलै 2022 रोजी ‘ हॉटेल यश -2’ लातूर रोड, अहमदपूर येथे आयोजित केला होता. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झी टॉकीन फेम किर्तनकार ह.भ.प. गाथामूर्ती श्री कृष्णदास महाराज महाळंगकर यांच्या हस्ते आणि अहमदपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज डॉ. राजुरकर, डॉ. मधुसूदन चेरेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉ. निलेशजी मजगे, डॉ. सतिशजी पेड, डॉ . बाळासाहेब मूंढे, डॉ. शशिकांतजी गुणाले, डॉ. तुकाराम बेंबडे डॉ. बालाजी मुंडे, डॉ. अर्चना भुरे, डॉ. कासले मॅडम डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. जाधव यांचा या सोहळ्यामध्ये यथोचित सन्मान करण्यात आला. गाथामुर्ती ह.भ.प. कृष्णदास महाराज महाळंगकर यांनी डॉक्टरांप्रती आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नागनाथ कदम यांनी, सुत्रसंचलन बालाजी तुरेवाले आणि आभार दशरथ जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी सेवानिवृत्त विस्ताराधिकारी वामनराव सांगुळे, अहमदपूर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, सेवानिवृत केंद्रप्रमुख बब्रुवानजी पवार माधवजी कंदे, गणपतरावजी कानवटे, सटवाजी कांबळे, जीवन नवटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजीवनी मेडीकलचे श्रीधर पाटील, सिद्धेश्वर आमदार, सचिन रेचवाड यांनी परीश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!