बनशेळकी सोसायटीच्या निवडणुकीत ग्रामविकास विकास पॅनलचे 10 उमेदवार विजयी !
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यात बनशेळकी येथील विविध विकास सहकारी सोसायटी निवडणुकीत सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रल्हाद महाजन यांच्या
ग्रामविकास विकास पॅनलचे 10 उमेदवार निवडून आले आहेत.तर विरोधी असणाऱ्या नवयुवक शेतकरी विकास पॅनलचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत.
ग्रामविकास विकास पॉनलेचे विद्यमान चेअरमन प्रल्हाद वैजनाथ महाजन,गुरनाथ विरसेटी आंबेगावे,रोहिदास कल्लपा लोहारे,संगमेश्वरं नरशिंग महाजन,आवाळे अविनाश व्यकंटराव, शेख मलंग गफुरसाब,मानकरे त्रबंयक शेटीबा,स्वामी महादेव बंडेप्पा, मांग्लाबाई शिवराज आंबेगावे,पटवारी शकुंतला आणणारावं,तर
नवयुवक शेतकरी विकास पॅनलचे महाजन बालाजी नरसिंग, आंबेगावे रायप्पा काशिनाथ हे दोन उमेदवार निवडून आले आहेत.त्यचबरोबर मागासवर्गीय मतदार संघातून ग्रामविकास विकास पॅनलचे बाळू अशोक चव्हाण बिनविरोध निवडून आले आहेत
सदरील निवडणूक निवडणूक अधिकारी चोले व सोसायटी सचिव हसराज मोमाले यांचासह अधिकारीनी निवडणुकीचे काम् पहिले.
निवडणुकीचे निकाल लागताच विजय उमेदवार चे
गावात फटाके वाजून व गावातून मिरवणूक काढून जल्लोष केला.गावाकऱ्यांनी पुन्हा एकदा विद्यमान चेअरमन पल्हाद महाजन यांना संधी दिली आहे.
