इनरव्हील क्लब उदगीर ” पहिला चार्टर डेचा” दिमाखदार सोहळा संपन्न
इनरव्हील क्लब उदगीर यांचा २९ जून रोजी रघूकुल मंगल कार्यालय येथे पहिला चार्टर डेचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब, अहमदपूरच्या माजी अध्यक्षा मा डॉ सौ मीनाक्षी करकनाळे, माजी सचिव
मा डॉ सौ भाग्यश्री येलमटे , नुतन अध्यक्षा मा डॉ वर्षा भोसले नुतन सचिव मा.विजया भुसारे , इनरव्हील क्लब,चाकूरच्या अध्यक्षा मा डॉ अंजली स्वामी इनरव्हील क्लब लोहाच्या अध्यक्षा मा.शोभा बगडे व सचिव मा सौ गायत्री अंबेकर इनरव्हील क्लब नांदेडच्या अध्यक्षा मा सौ गायत्री तोष्णीवाल व सचिव मा.मंजु बियाणी मा.सौ मीरा चंबुले(अध्यक्ष इनरव्हील क्लब उदगीर)मा सौ शिल्पा बंडे (सचिव इनरव्हील क्लब उदगीर) हे मंचावर उपस्थित होते.याच बरोबर इनरव्हील क्लब अहमदपूर,चाकूर,लोहा, नांदेड येथील सदस्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
आदिती महाजन या चिमुकलीच्या मंत्रमुग्ध करणार्या स्वागत नृत्यानी कार्यक्रमाची सुरुवात झाली.इनरव्हिल क्लब,उदगीर सदैव समाज हितासाठी समाज उपयोगी कामे करण्यात पुढाकार घेत असतो आणि त्यासाठीच गेल्या वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे प्रायोजक सदस्य (प्रोजेक्ट स्पाॅनर्स) अशा २० सदस्यांचा सत्कार करण्यात आला.याच बरोबर इनरव्हील क्लब उदगीर मध्ये नवीन सहभागी झालेल्या ३१ सदस्यांचा आणि इनरव्हील क्लबच्या पाठीशी असणार्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.“प्लास्टिक पिशवी टाळा कापडी पिशवीची कास धरा “
हा संदेश देण्यासाठी सर्वांना भेटवस्तू म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.आणि सभागृहात सर्वत्र जन जागृती साठी पोस्टर लावण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा सौ मीरा चंबुले, अध्यक्षा इनरव्हील क्लब,उदगीर यांनी केले ” आमच्या इनरव्हील क्लबचे ब्रीद वाक्य मैत्री व सेवा घेऊन आम्ही कार्य करत आहोत अहमदपूर क्लबच्या विशेष पाठिंब्यामुळे आम्ही या कार्याशी जोडले गेलो आमच्या क्लब मधील प्रत्येक सदस्यांची सदैव साथ आहे याचा अभिमान आहे आणि असेच कार्य पुढे करत राहू” असे मत त्यांनी व्यक्त केले. मंचावरील मान्यवरांनी शुभेच्छा रूपी संदेश दिला ” “इनरव्हील क्लब उदगीर अतिशय सुंदर कार्य करत आहे आणि या क्लबच्या सदस्यांची एकजूट कौतुकास्पद आहे “असे मत मा डॉ सुनीता शिंदे ( माजी अध्यक्ष, इनरव्हील क्लब, अहमदपूर) यांनी व्यक्त केले.
या चार्टर डेच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम नांदेड इनरव्हील क्लब यांनी कव्वाली सादर केली वयाची पन्नाशी पार केलेल्या या महिला सदस्यांचा जोश बघण्यासारखा होता.चाकूर इनरव्हील क्लबने हिंदी चित्रपट गीतांवर बहेतरीन नृत्य केले, इनरव्हील क्लब, अहमदपूरचे संगिता खंडागळे व पुजा रेड्डी यांनी सुरेख नृत्य सादर केले इनरव्हील क्लब उदगीरच्या वतीने एक नाटीका सादर करण्यात आली मोबाईल व सोशल मीडियाच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम हा विषय असणार्या या नाटकात सौ रोहिणी चाटे ,सौ सुप्रिया महाजन,सौ तुलसी देशमुख, सौ मीरा गुरुडे,सौ पुजा गर्जे यांनी सहभाग घेतला होता तर नाटकाचे दिग्दर्शन सौ मानसी चन्नावार यांनी केले याच बरोबर मीरा चंबुले (दिल है छोटा सा) ,राखी सुगंधी,(स्त्रीशक्ती)नेहा जैन (स्त्री भ्रूणहत्या), मानसी चन्नावार (रेट्रो से मेट्रो) यांनी अप्रतिम नृत्य सादर केले प्रीती दुरुगकर , वृषाली चवळे यांची सुमधुर गीते सुहासिनी सुरशेटवार,लता प्रेमचंदनानी यांच्या स्वरचित कविता असा विविध रंगी कार्यक्रम फुलून आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा सौ अश्विनी देशमुख व सौ स्वाती गुरुडे यांनी केले आभार प्रदर्शन सौ स्वाती गुरुडे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीतांनी करण्यात आली. कार्यक्रमासाठी मीरा चंबुले अध्यक्ष,स्वाती गुरुडे उपाध्यक्ष, शिल्पा बंडे सचिव निलिमा पारसेवार सहसचिव, पल्लवी मुक्कावार एडिटर मानसी चन्नावार कोषाध्यक्ष, स्नेहा चणगे आय एस ओ व सर्व सदस्यांनी यांनी परिश्रम घेतले.
