तळेगाव रोड बनला मौत का कुआ….

तळेगाव रोड बनला मौत का कुआ....

सामाजिक कार्यकर्ते महेश देवणे यांचा आंदोलनाचा इशारा

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातून तळेगाव कडे जाणारा रस्ता मौत का कुआ बनला असून याकडे बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे .गेल्या दोन महिन्यापासून अहमदपूर ते तळेगाव लगत पुढे बांधकाम विभागाचे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून ते सध्या स्थितीमध्ये खोदकाम करून अर्धवट ठेवले आहे. तळेगाव रोडवरील दूरसंचार कार्यालयापासून ते जय हिंद प्रयाग विद्यालयापर्यंत एका बाजूने सलग चार फूट खोल व दहा फूट रुंद खोदकाम करण्यात आले असून एका बाजूने मोठा नाला आहे तर डांबरीकरणाचा मुख्य रस्ता दहा फुटाचा असून तो अरुंद आहे. तळेगाव रोड वरून तेलगाव पाटी ची वाढती रहदारी आणि जुन्या अहमदपूर गावामध्ये जाणारा रस्ता याच रोडवरून जात असल्याने दुचाकी, चार चाकी, स्कूल बस, व अवजड वाहने सतत जात असल्याने या ठिकाणी रहदारीचा सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे .शाळा, कॉलेज , क्लासेस याच भागात असून बरेच पालक आपल्या पाल्यांना घेऊन वास्तव्यास आहेत त्यामुळे विद्यार्थी संख्याही भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहे .खोदकाम करून ठेवल्याने लहान मुले नेहमी या खड्ड्यात पडत आहेत त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने लहान मुलांच्या जीवितास अजून जास्तीचा धोका निर्माण झाला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे . आतापर्यंत वाहनधारक समोरासमोर बाजू देताना बरीच वाहने खड्ड्यात पडली असून वाहनधारकांचे खूप नुकसान होत आहे त्यांना बाजू देण्यास समस्या निर्माण होत असून आपापसात वाद निर्माण होत आहेत. एका बाजूस मोठा नाला तर दुसऱ्या बाजूस खोदकाम त्यामुळे मोठ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहने जागेवर तासंतास थांबून राहतात. लवकरात लवकर उपविभागीय अभियंता आणि मुकदम यांना सूचना देऊन तात्काळ हे काम मार्गी लावू नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश देवणे यांनी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी अरुण फुलारी यांना दिले आहे याची माहितीस्तव एक प्रत तहसीलदार साहेब अहमदपूर व उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग अहमदपूर यांना देण्यात आली असून निवेदनावर शिवाजीनगर ,त्रिवेणी नगर, भगवान नगर ,बँक कॉलनी, येथील रहिवासांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!