प्रेमदास राठोड यांचे एनडीए परीक्षेत यश…

प्रेमदास राठोड यांचे एनडीए परीक्षेत यश...

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी येथील पु अहिल्या देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी राठोड प्रेमदास उत्तम या विद्यार्थ्यांने मे २०२१ मध्ये झालेल्या एनडीएच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण घेऊन सुयश प्राप्त केले.सध्या तो कतार या देशात कॅबिन क्रु ऑफिसर म्हणून पोस्टिंग मिळाली आहे.
यानिमित्ताने शाळेच्या वतीने प्रेमदासचा सत्कार संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांनी केला व त्यास आशीर्वाद दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मुळे यांनी केले.याप्रसंगी प्राचार्या रेखाताई तरडे म्हणाल्या की, पहिली पासून मुलांनी मन लावून अभ्यास केला तर शाळेतच त्याची पूर्ण तयारी होते व तो जीवनात यशस्वी होतोच.कुठलाही खाजगी क्लास न लावता या विद्यार्थ्यांने संपादन केलेले यश कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!