माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते कुमठा (बु), व हासरणी, टेंभुर्णीच्या नुतन सोसायटी संचालकाचा सत्कार संपन्न

माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते कुमठा (बु), व हासरणी, टेंभुर्णीच्या नुतन सोसायटी संचालकाचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या कुमठा बु.व हासरणी- टेंभुर्णी ता.अहमदपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अतितटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे समर्थक असलेल्या कुमठा बु.व हासरणी- टेंभुर्णी येथील कार्यकर्त्यांनी एक तर्फी विजय मिळवला. कुमठा बु.व हासरणी- टेंभुर्णी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित सर्व संचालकांचा यथोचित सत्कार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते येथील शासकीय विश्रामगृहात नुकताच करण्यात आला.
यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे,पंचायत समितीचे माजी सभापती अँड.आर.डी. शेळके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील, ह.भ.प.व्यंकटराव गौंड, बालाजी ग़गथडे, रामराम आढाव,मोहण कोपनर, धनाजी गौंड, सुरेश काका पाटील,माधव गौंड, संपत गौंड, अँड गोविंद सांळुखे,केशव साळुंखे, गोविंद येथे,अंगद सांळुखे, नरसिंग सांळुखे,अमित रेड्डी, राजू खंदाडे, अमित बिलापट्टे यांच्या सह नुतन संचालक सर्वश्री जाधव अर्जुन बालाजी, ढोकाडे संभाजी गणपत,
पाटील चंद्रजीत माधवराव, बायस गजेंद्र नरेंद्रसिंग, भोसले रामराव बाबाराव, माळवदे व्यंकटराव बापूराव, मुंजेवार गणीसाब रसुलसाब, यमुलवाड दत्ता सोपान, मरवाळे चौत्राबाई प्रभाकर, मुंडकर कांताबाई बालाजी, सुर्यवंशी बिलास संभाजी, डोंगरे शिवलिंग मारोती, टिकोरे शामराव निवृत्ती यांच्या सह कुमठा व हासरणी, टेंभुर्णी येथील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!