तूकाराम पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रवींद्रनाथ टागोर विद्यालयातील ग्रंथपाल तूकाराम पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त नूकाताच सत्कार करून निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक विक्रमसिंह दोडके पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, युवामोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. अमित रेड्डी, नगरसेवक अभय मिरकले,शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा.दत्ताभाऊ गलाले, पुरूषोत्तम माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी संस्थेच्या वतीने तुकाराम पाटील यांचा सपत्नीक आहेर देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की, नोकरी म्हटली की, भरती, बदली, बढती आणी सेवानिवृत्ती ही बाब क्रमप्राप्त आहे. मात्र दिलेल्या पदावर काम करत असताना आपण ते काम किती प्रामाणिकपणे केले आहे यावरच मूल्यमापन होत असते.आता तूकाराम पाटील सरांनी सेवानिवृत्ती नंतर स्वतःला सामाजिक क्षेत्रात गुंतवून घ्यावे असे अवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक तथा संचलन बसवराज थोटे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक क्षिरसागर सर यांनी मानले.
