अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात एन. एस. एस. च्या वतीने वृक्षारोपण

अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात एन. एस. एस. च्या वतीने वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनाचे औचित्य साधून विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर, यावेळी स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद येथील डॉ. जे. एस. गंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले व महाविद्यालय परिसरात तसेच महाविद्यालयाच्या राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते कवठ, पैताड , पारिजातक, सप्तपर्णी आदी प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने पारिजातकांचे वृक्षारोपण कृषी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी महाविद्यालयास दोन पारिजातकांची रोपे भेट देऊन राजमाता जिजाऊ उद्यानात भर टाकली आहे. या वृक्षाचेही यावेळी विद्यार्थिनी कु.विद्या केंद्रे, डॉ.गंगणे, डॉ.बब्रुवान मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाधिकारी डॉ.पी. डी. चिलगर, प्रो. डॉ.अनिल मुंढे,डॉ .सतीश ससाने, डॉ.बब्रुवान मोरे, डॉ. प्रशांत बिरादार, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. अभिजीत मोरे, प्रा. आतिश आकडे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, वामन मलकापूरे, शिवाजी चोपडे , चंद्रकांत शिंपी आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!