महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : जगात भारताची मान अभिमानाने उंचावणारे महान तत्त्वज्ञ व विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना येथील महात्मा फुले महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी भूषविले तर संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी डॉ.सतीश ससाणे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. मारोती कसाब, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!