सदस्य नोंदनी मोहीम राबवा – देवेंद्र कांबळे विधानसभा संपर्क प्रमुख
उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर शिवसेना, युवासेना, महिलाघाडी, आजीमाजी पदाधिकारी यांची बैठक देवेंद्र कंबळे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळेस सर्वांनी ग्वाही दिली की, उदगीर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार,शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या संख्येने राबवण्याचे कंबळे यांनी सांगितले, लवकरच सदस्य नोंदणी मोहीम चालू होईल.
बैठकी प्रसंगी चंद्रकांत टेंगेटोल तालुकाप्रमुख, श्रीमंत सोनाळे विधानसभाप्रमूख, अरुणताई लेंडाणे महिला आघाडी उपजिल्हासंघटिका,ब्रम्हाजी केंद्रे,कैलास पाटील,रमण माने युवासेना उपजिल्हाप्रमुख,उपेंद्र काळेगोरे तालुकाप्रमुख,अरुण बिरादार ता. संघटक,रोहित पाटील युवासेना शहरप्रमुख,व्यंकट साबणे,शैलेश वडगावे,अंकुश तातपल्ले उ ता प्र,संजय मठपती,बालाजी पुरी,प्रशांत जाधव,लखन घोणसे,प्रदीप पाटील,मलंग इंजिनिअर,आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
