साहित्यसम्राट आणाभाऊ साठे यांच्या 102 व्या सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे तर कार्याध्यक्ष म्हणून नवज्योत शिंदे यांची निवड

साहित्यसम्राट आणाभाऊ साठे यांच्या 102 व्या सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे तर कार्याध्यक्ष म्हणून नवज्योत शिंदे यांची निवड

उदगीर (प्रतिनिधी ) : उदगीर शहरासह संपूर्ण तालुक्यात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात येते .याही वर्षी उदगीर शहरात जयंती आगळी वेगळी साजरी करण्याच्या हेतूने विकास पुरूष उदगीरचे भाग्य विधाते माजी आ सुधाकर भालेराव यांच्या निवास स्थानी बैठक घेण्यात आली.या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली .
सार्वजनिक जयंती समितीचे पदाधिकारी या वर्षी बाहेर कोणतीच पट्टी मागायचे नाही असे ठरले. याला सर्वांनी सहमती दर्शविली . या वर्षाची जयंती खेळी मेळीत साजरी करण्याच्या हेतूने व समाजात एकोपा, शांतता, समता, बंधूभाव जपण्याच्या हेतूने युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटोदे यांची निवड सर्वानुमत्ते करण्यात आली.तर कार्याध्यक्ष म्हणून युवा नेते नवज्योत शिंदे यांची निवड करण्यात आली. स्वागताध्यक्ष सतिष उस्तुरे , उपाध्यक्ष लकी पाटील जिलानी शेख, प्रदिप महापुरे,राजू सुर्यवंशी,राम शिंदे ,उध्दव लहुजी गायकवाड, सचिव अर्जुन जाधव, सहसचिव बबन कांबळे ,कोषाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख अनिल जाधव, माधव घोणे, प्रभूदास गायकवाड, सुनिल सुतार, राजीव किनीकर, मुख्य संयोजक राम जाधव, हुसेन अंधारे ,अमर सुर्यवंशी तर सल्लागार म्हणून जवाहरलाल कांबळे, अॅड विष्णू लांडगे ,अॅड मारोती चव्हाण,अॅड श्याम कांबळे , बालाजी गोटमुकले, पप्पू गायकवाड , रविंद्र बेद्रे , सुनिल रामराव गायकवाड , सौ भारती सुर्यवंशी, साै रमाताई वाघमारे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांना या कार्यकारणीत समाविष्ठ करण्यात आले .या बैठकीचे प्रस्ताविक राम जाधव यांनी केले तर आभार बबन कांबळे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!