उदगीर शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबतच – टेंगेटोल
उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर तालुक्यातील शिवसैनिक सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एकनिष्ठ आहेत कोणीही बंडखोर आमदारांना पाठिंबा दिलेला नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सध्या शिवसेनेअंतर्गत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शिवसेना अंतर्गत बंडखोरीचा वाद बाजूला सारून शिवसेना एक संघ आणि सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेली असणार आहे त्या पार्श्वभूमीवर नव्याने पुन्हा शिवसैनिकाची नोंदणी सुरू आहे. त्यानिमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते या बैठकीसाठी खास करून शिवसेना, युवासेना, महिलाघाडी ,आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष करून याबैठकीसाठी संपर्कप्रमुख देवेंद्र कंबळे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळेस सर्वांनी ग्वाही दिली की उदगीर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार,शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या संख्येने राबवण्याचे कंबळे यांनी सांगितले, लवकरच सदस्य नोंदणी मोहीम चालू होईल,बैठकिप्रसंगी चंद्रकांत टेंगेटोल तालुकाप्रमुख, श्रीमंत सोनाळे विधानसभाप्रमूख, अरुणताई लेंडाणे महिला आघाडीउपजिल्हासंघटिका,ब्रम्हजी केंद्रे,कैलास पाटील,रमण माने युवासेना उपजिल्हाप्रमुख,उपेंद्र काळेगोरे तालुकाप्रमुख,अरुण बिरादार ता संघटक,रोहित पाटील युवासेना शहरप्रमुख,व्यंकट साबणे,शैलेश वडगावे,अंकुश तातपल्ले उ ता प्र,संजय मठपती,बालाजी पुरी,प्रशांत जाधव,लखन घोणसे,प्रदीप पाटील,मलंग इंजिनिअर,आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
