नांदगाव सोसायटीच्या चेअरमन पदी सतिश कुलकर्णी तर व्हाईस चेअरमनपदी व्यंकट घोडके

नांदगाव सोसायटीच्या चेअरमन पदी सतिश कुलकर्णी तर व्हाईस चेअरमनपदी व्यंकट घोडके

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सतिश कुलकर्णी यांची तर व्हाईस चेअरमन पदी व्यंकट घोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दि. 9 जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे डी एस यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी सभागृहात नूतन संचालकाची बैठक घेऊन ही निवड करण्यात आली. त्यावेळी नूतन संचालक आनंद पाटील, भगवान ढमाले, दिलीप पाटील, नंदकुमार पाटील, सिध्दाजी माने, विष्णु वाघमारे, बळीराम कळबंडे, राम ढमाले, मुरलीधर कांबळे, सुरेखा राजेंद्र चिगुरे, श्रीमती चंद्रकला विठ्ठल जगताप या संचालक मंडळाच्या वतीने नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रदिप गर्जे, बापुराव साळुंके, भागवत पाटील, रोहित पाटील, विश्वनाथ पाटील, सुधाकर ढमाले, सुधाकर पाटील, उत्तम सुरवसे, दिलीप जगताप, बालाजी चिगुरे, प्रकाश पाटील, पंडित रिद्दीवाडे, बापुराव कांबळे, राजकुमार पाटील, मुकिंद पाटील आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे डी एस व गट सचिव लोखंडे एन डी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

About The Author

error: Content is protected !!