संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे जवाहर नवोदय परीक्षेत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : 30 एप्रिल 2022 रोजी झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाची गार्गी चंद्रशेखर नळेगावकर जिल्ह्यात सर्वप्रथम आली असून श्रावणी हरिदास भंडे व धनराज सिद्धार्थ कांबळे या तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड झाली आहे. सदरील परीक्षेसाठी विद्यालयातील 95 विद्यार्थी बसले होते.यशस्वी विद्यार्थ्यांना सविता पाटील, सतीश साबणे, शारदा तिरुके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, मीनाताई देवकते, कौशल्या कांबळे, सुरेंद्र चाकूरकर, जनार्धन गायकवाड, रमेश हाके, संस्था समन्वयक कुलदीप भैय्या हाके, अमरदीप हाके, मुख्याध्यापिका आशा रोडगे मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, मुख्याध्यापक परमेश्वर पाटील सह शिक्षिका संजीवनी गुरमे, शबाना शेख, त्रिगुना मोरगे ,अश्विनी घोगरे, आयोध्या जाधव ,नंदकुमार मद्देवाड सह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
